भूम (प्रतिनिधी)- बंधुत्व, प्रेम आणि आपुलकीचा सण रक्षाबंधन प्राईड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. भारताच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या शूर सैनिकांना राखी पाठवून व शाळेच्या लहानग्यांनी सोजर मूकबधिर शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या हातावर प्रेमाने राख्या बांधल्या आणि गोडवाटून त्यांचा आनंद द्विगुणित करत रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांना सणांच्या उत्साहात सामील करून घेण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. राखी बांधताना लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर मूकबधिर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. या भेटीमुळे बंधुत्वाचा धागा आणखी घट्ट झाला.सोजर चे सावंत सर मुख्याध्यापक,प्रशांत गवळी सर, चव्हाण सर, भंडारे सर, नलवडे सर, नरवडे मॅडम, राहूल झांबरे आदींनी मुलांचे स्वागत केले.देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर वाढावा यासाठी सैनिकांना राखी पाठवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या राखी स्पीड पोस्टाने पाठवण्यात आल्या. यावेळी प्राईड शाळेच्या भाग्यश्री डांगे, मेघा सुपेकर, दिपीका टकले व सेविका आशा म्हेत्रे अरुणा बोत्रे यांनी परिश्रम घेतले.