उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा व लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आमदार प्रविण स्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

आमदार प्रविण स्वामी यांनी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध भागात दि. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जनावरांचे पुरात वाहून जाणे, विविध दुर्घटना घडणे, तसेच अनेक घरे पडझड होऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने, संबंधित विभागामार्फत तातडीने नुकसानीचे सरसगट पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना आवश्यक ती मदत व नुकसान भरपाई देण्याची दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.

 
Top