भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील देवग्रा येथे जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी व ग्रामपंचायत मधील अनियमितता यासाठी 15 ऑगस्ट पासून सुरू असलेले आमरण उपोषण चार दिवसानंतर गटविकास अधिकारी यांच्या आश्वासनानंतर संपले आहे.
देवग्रा गावातील माजी सैनिक रामराजे भाऊसाहेब डोके यांनी ग्रामपंचायत मधील अनियमितता व जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणी करता उपोषण सुरू केले होते. दि. 19 ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी वजे, जलजीवन मिशनचे अधिकारी ,माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये उपोषण मागे घेण्यात आले .गटविकास अधिकारी यांनी दोन्ही विभागाची ता 26 रोजी सुनावणी करून
ग्रामपंचायत ने खरेदी केलेल्या वस्तूमधील तफावाची पारदर्शकता तपासल्यानंतर व जलजीवन मिशन मधील कामाची सखोल चौकशी करून स्पेशल ऑडिट व इस्टिमेट प्रमाणे केलेल्या कामाची चौकशी करून ता 15 सप्टेंबर रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल असे गटविकास अधिकारी यांनी यावेळी सांगितले .यावेळी माजी सैनिक संघटनेचे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर हाके, कार्याध्यक्ष प्रल्हाद कुटे, कोषाध्यक्ष दादाराव जाधव, प्रवक्ता ॲड. भगवानराव नागरगोजे, मधुकर वाघमोडे, नामदेव माने, बाळराजे पाटोळे, नाना गव्हाणे, रामराजे डोके, तानाजी अंधारे, दत्ता पवार, पांडुरंग खोसे, दासराव पवार, शहाजी पगारे, राजाराम वाघमारे, दत्तात्रय गिलबिले, साहेबराव झोरे, प्रमोद जाधव, नारायण जाधव, दादाहरी तेलंगे, प्रभाकर वरबडे, शिवाजीराव चव्हाण, भगवानराव धुमाळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.