तुळजापूर (प्रतिनिधी)- संपुर्ण देशभरात अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन केले जात आहे. त्या अनुषंगाने तुळजापूर शहरात 12 ते 17 ऑगस्ट या कालावधीत दोन बँचमध्ये या “आनंद अनुभूती उत्सव“ शिबिरास प्रारंभ झाला असून यामध्ये प्रामुख्याने तुळजापूर खुर्द रोडवरील शिव पार्वती मंगल कार्यालयात सकाळी 6 ते 8:30 वाजेपर्यंत तर दुसरी बँच येथील आठवडा बाजार जवळील सुमेरु हाँलमध्ये सायंकाळी 6 ते 8:30 या वेळेत आनंद उत्सव शिबीरास सुरुवात करण्यात आली आहे. या शिबिरात सकाळच्या बँचमध्ये पुरुष प्रशिक्षणार्थी  98 तर 16 महिला प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून सायंकाळच्या बँचमध्ये 15 पुरुष प्रशिक्षणार्थी तर 20 महिला प्रशिणार्थी अशा एकूण 149 जणांनी सहभाग घेतला आहे. या शिबिरात साधक आनंदी जीवन जगण्याचा आनंद घेत आहेत.

या शिबिरात आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक डॉ.जितेंद्र कानडे,प्रशांत संकपाळ,सचिन सूर्यवंशी, शशिकांत कदम, डॉ. राहुल पाटील, राजू देशमुख हे पुर्णवेळ उपस्थित राहून शिबिरार्थींना मार्गदर्शन करीत आहेत. तसेच स्वयंसेवक म्हणून कार्तिक जगताप, विनायक शेटे,राहुल साखरे, विजयकुमार भगरे,प्रवीण मैंदर्गी, गणेश खानवटे,हनुमंत गपाट, बालाजी घुगे आदीजण उत्तम सेवा बजावत आहेत.

या शिबिरात,लोकांना आनंदी आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी प्रशिक्षक डॉ. जितेंद्र कानडे शिबिरार्थींना मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार,योगा,प्राणायाम, ध्यान,उज्जयी श्वसन,भस्रिका, सुदर्शन क्रिया यासारख्या योगीक क्रिया शिबिरार्थीकडून करून घेण्यात येत आहेत. यास शिबिरार्थीकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना प्रशिक्षक डॉ. जितेंद्र कानडे म्हणाले की सुदर्शन क्रियामुळे शरीर,मन निरोगी राहते. नकारात्मक भाव नष्ट होतात. मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्य सुधारते, माणूस वर्तमानात जगायला शिकतो. त्यामुळे सुखी व आनंदमय जीवनाची अनुभूती येते. आनंद अनुभुती शिबिरातून माणसाचे व्यक्तिमत्व खुलून कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचेही त्यांनी आवर्जून सागितले. त्याच बरोबर शिबिरार्थीं लोकांना त्यांच्या भावना आणि अनुभवांबद्दल बोलण्यासाठी संधीही मिळत आहे. या शिबिराच्या माध्यमातून सहभागी लोकांना इतरांशी चांगले संबंध निर्माण करणे आणि सामाजिक संबंध सुधारणे, नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे,त्याचबरोबर आनंदी आणि सकारात्मक जीवनशैली जगण्याचा अनुभव या शिबिराच्या माध्यमातून मिळत आह़े.

 
Top