तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणसाठी मोर्चे झाले, आंदोलन झाले, तरीही सरकार आरक्षण देत नसल्याने आई भवानी तु या सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समजुन सांग असे साकडे बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी रात्री मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी देविला घालुन रथयात्रा पुढे मार्गस्थ झाली.
यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले कि, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जनजागृती काढल्याचे सांगुन 28 तारखेला याचा सांगता होताच आम्ही मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात समाजाला न्याय मिळेपर्यत त्या संघर्ष लढ्यात सहभागी होणार आहोत. सरकारने आरक्षण न दिल्यास मुख्यमंत्री, उपमुखमंञी यांना कार्तीक एकादशी याञेत अडवणार, मराठ्यांची दहशत देशाला माहीत आहे. आम्ही ठरवले तर कुणी का माईका लाल असेना मुख्यमंञ्यांना पंढरपूरात येवु देणार नाही म्हटले कि नाहीच असा इशारा यावेळी दिला. रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज रायगड, राजमाता माँ जन्मस्थळ, शिवतीर्थ आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देणार आहे.
यावेळी आशु लबडे, अर्जून आप्पा सांळुके, कुमार टोले, विकी वाघमारे, बाळासाहेब भैय्ये, धनगर समाजाचे संतोष दुधभाते, अविनाश नवगिरे, यावेळी मंदीरात हजारो मराठा बांधव, उपस्थितीत होते. यावेळी जय भवानी, जय शिवाजी मराठ्यांना आरक्षण ओबीसीतुन दिलेच पाहिजे अशा घोषणांना मंदीर परिसर दणाणुन गेला होता.
