धाराशिव (प्रतिनिधी)- तालुकास्तरीय शालेय योगासन क्रीडा दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी श्री श्री गुरुकुल अणदुर येथे पार पडलेल्या. स्पर्धेत एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
14 मुली गटात प्रियंका देवकते हिने तृतीय, तर विजया पवार हिने सहावा क्रमांक मिळविला. 14 मुलगे गटात आकाश दूधभाते द्वितीय, प्रणय सुपलकर तृतीय व दर्शन दकुरकर चौथ्या क्रमांकावर राहिले. 17 मुली गटात अस्मिता जाधव हिने तृतीय व प्राची पाटोळे हिने चौथा क्रमांक पटकाविला. 17 मुलगे गटात ज्ञानेश्वर काळे पाचव्या क्रमांकावर, तर 19 मुली गटात सृष्टी कोळी हिने द्वितीय क्रमांक मिळविला. याशिवाय रिदमिक योगा प्रकारात प्राची पाटोळे, सृष्टी कोळी, सलोनी राठोड व ज्ञानेश्वर काळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. आर्टिस्टिक योगा प्रकारातही ज्ञानेश्वर काळे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
या सर्व विजयी खेळाडूंची पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर योगा प्रशिक्षक प्रणिता ताई यांचे संस्थेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्यवाह विवेक अयाचीत, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, संचालक मंडळ, क्रीडा समिती सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.