भुम (प्रतिनिधी)- विद्या विकास मंडळ पाथरुड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथे 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्यात आला. या आठवड्यात विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
सप्ताहात पथनाट्य सादरीकरण करून रॅगिंगचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले गेले. तसेच पोस्टर स्पर्धा घेण्यात येऊन रॅगिंगविरोधी संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
सप्ताहाचा समारोप ॲड. अमृता गाढवे यांच्या व्याख्यानाने झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगसंदर्भातील कायदे व दंडात्मक तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संतोष शिंदे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी बोराडे, प्रा. श्री. जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. एस. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती गीरी यांनी केले. तर प्रा. राहुल राठोड यांनी आभार मानले.