धाराशिव (प्रतिनिधी)-   डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव येथील आर. पी. औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक प्रा. अजहर हुसेन शेख यांना जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटीतील फार्मसी विद्या शाखेतून प्रदान करण्यात आली. 

प्रा. अजहर शेख यांनी स्क्रीनिंग ऑफ व्हेरियस गुगलस फॉर इट्स मल्टी फार्माक्लाजीकल इफेक्ट्स इन डायबिटीक पॅथॉलॉजी या विषयावर संशोधन केले. त्यांच्या या शोधनिबंधाचे अनेक संशोधन लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत. त्यांना या संशोधनासाठी जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटी मधील फार्मसी विभागाचे डायरेक्टर डॉ. शुभ्रांशू पांडा यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी, सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 
Top