तुळजापूर (प्रतिनिधी)- महसूल मंडळ मंगरुळ परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचे घास हिरावून नेणाऱ्या या आपत्तीबाबत तातडीने पंचनामे करून शासनस्तरावर मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी शाम कमलाकर साठे-पाटील यांनी मुख्यमंत्री व तहसीलदार यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.


 
Top