तुळजापूर (प्रतिनिधी)- आई तुळजाभवानीच्या पावन नगरीतील पोलीस बांधवांना शहरातील भगिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर शहरातील विविध भागातील महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या ‌‘समाजरक्षक' भावांना राख्या अर्पण केल्या.

महिलांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना मिठाई दिली आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी पोलीस बांधवांनीही बहिणींचे आभार मानत, त्यांच्या रक्षणाचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला तुळजापूरचे पी.आय. मांजरे, ए.पी.आय. नामदेव मद्दे उपस्थित होते.


 
Top