भूम (प्रतिनिधी)- पक्षाच्या धोरणानुसार ग्रामीण नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गे लागले पाहिजे. या उद्देशाने घेण्यात आलेल्या जनता दरबारमध्ये मांडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावले जातील. भाजपच्या जनता दरबारात 87 प्रश्न उपस्थित केले, 13 मार्गी लागले असे मत भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांनी तालुक्यातील ईट येथे जनता दरबारात बोलताना व्यक्त केले.
भूम तालुक्यातील ईट येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्प ते सिद्धी या कल्पनेतुन माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, माजीमंत्री आमदार राणाजगजीतसिह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या आदेशानुसार व राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जनता दरबार घेण्यात आला.
जनता दरबारास तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर, महादेव वडेकर, राजसिंह पांडे, काकासाहेब चव्हाण, प्रदीप साठे, बाबासाहेब वीर, रघुनाथ वाघमोडे, शरद चोरमले, अंकुश तिवारी, दिनकर कांबळे, विकास जालन, सुरेंद्र बोंदार्डे, भाऊसाहेब आव्हाड, पप्पू थोरात, राम चव्हाण, मारुती माळी, राहुल लिमकर, सुधाकर हाडुळे, बाबासाहेब गीते, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे अशोक महानवर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.