धाराशिव (प्रतिनिधी)-  महसूल विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.महसूल विभागाशी प्रत्येक नागरिकाचा संबंध येतो.जिल्हा व तालुका पातळीवर आयोजित लोकशाही दिनातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात यावे. नागरिकांना पारदर्शी, गतिमान व लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे.असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 7 ऑगस्ट रोजी महसूल विभागाचा आढावा घेताना बावनकुळे बोलत होते.यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवास उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,प्रवीण धरमकर,संतोष राऊत,स्वाती शेंडे,अरुणा गायकवाड,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख व संजय पाटील तसेच सर्व तहसीलदार प्रामुख्याने उपस्थित होते.


अभियान प्रभावीपणे राबवा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभिमान प्रत्येक मंडळात प्रभावीपणे राबवून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. जिवंत सातबारा अभियान प्रभावीपणे राबवा. ॲग्रीस्टॅकचे काम जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांचे डीबीटी झालेले नाही त्यांच्या देखील घरी जाऊन डीबीटी करण्यात यावे. रस्ता अदालत प्रत्येक गावात तहसीलदारांनी घ्यावी, असे सांगून बावनकुळे म्हणाले की,नियमानुकूल असलेली अतिक्रमणे तीन महिन्याच्या आत काढण्याची कार्यवाही करावी. असे बावनकुळे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी पूजार यांनी यावेळी सादरीकरणातून महसूल विभागाकडून ई-ऑफिसचा वापर करण्यात येत आहे.नव्याने शेतरस्ते उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिवंत शेतरस्ता, पाणंद रस्ता,ई-फेरफार, दहन व दफन भुमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून,उर्वरित ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.


 
Top