धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 2 ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यभर “हर घर तिरंगा” अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्याअंतर्गत धाराशिव जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीत भोसले हायस्कूल,छत्रपती विद्यालय,शासकीय नर्सिंग कॉलेज येथील 200 विद्यार्थी तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
धाराशिव शहरातील युवक,युवती, खेळाडू आणि नागरिकांना मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे. रॅलीचा मार्ग हा जिल्हाधिकारी कार्यालय - पोलीस अधीक्षक कार्यालय - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत - महात्मा बसवेश्वर चौक - माणिक चौक - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET कॉलेज) येथे रॅलीचा समारोप होईल.