धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या पूर्वीच आपल्या विविध विधानांनी संपूर्ण राज्यात भरघोस अशी प्रसिद्धी मिळविलेली आहे. शेतकऱ्यांचा अर्वाच्च भाषेत उद्धार करणे असो किंवा पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी असो, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दि.22 जुलै रोजी केली आहे.
मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वीच आपल्या विविध विधानांनी संपूर्ण राज्यात भरघोस अशी प्रसिद्धी मिळविलेली आहे. शेतकऱ्यांचा अर्वाच्च भाषोत उद्धार करणे असो किंवा पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी असो. त्यांचे कर्जमाफीवरील वक्तव्य तर संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले आहे. कृषी मंत्री यांनी शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे तसेच रविवारी दि.20 जुलै रोजी अधिवेशन सुरु असताना सभागहात चक्क पत्यांचा रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विविध वक्तव्य व कृतीमुळे राज्यातील जनतेकडून त्यांच्या विषयी तीव्र रोष वारंवार व्यक्त होत असून तो वाढत चालचा आहे. त्यामुळे कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात यावा व महाराष्ट्राची बदनामी थांबवावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी केली आहे.