भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील वारे वडगाव जिल्हा परिषद शाळेसमोरील प्रांगणात पावसामुळे चिखल होतो. तसेच पाणी साचले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ये-जा करण्यास समस्या निर्माण होतात. त्यामुळे थेट विद्यार्थी व ग्रामस्थांनी मिळून पंचायत समिती गेट समोर केले आंदोलन केले.
तालुक्यातील वारे वाडगाव जिल्हा परिषद शाळेसमोर पावसामुळे चिखल व घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जाण्या- येण्यास अडचण निर्माण होते. तसेच फेवर ब्लॉगचे काम सन 2023 मध्ये मंजूर असून झालेले नाही. म्हणून भूम पंचायत समितीच्या गेटवर वारे वडगाव येथील विद्यार्थ्यांनी जवळजवळ एक तास गेटवर हे आंदोलन केले व काम तात्काळ करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अंकुश वाघमारे, विवेक गोपने, अतुल सपकाळ, भैया सुपेकर, किरण गोपने, उल्हास सपकाळ, अविनाश सपकाळ, दत्ता नलवडे, हर्षल डिसले, धनाजी सपकाळ आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.