धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे बुधवार, 23 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृहात तेली समाजाच्या महत्वाच्या विषयांवर चर्चा व मार्गदर्शनासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी खासदार रामदास तडस, भूषण कर्डीले, गजानन शेलार, संजय बापू विभुते, सुनिल चौधरी, जयस बागडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत 10वी, 12वीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरलेल्यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजना, समाजविकास व युवा मार्गदर्शनावर सखोल चर्चा होणार आहे. धाराशिव जिल्हा तेली समाज सेवाभावी संघाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांनी समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 
Top