नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील आठवडी बाजार हा किल्ला गेट ते भवानी चौका पर्यंत भरविण्यात यावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश मोरडे व विजयसिंह ठाकूर यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदना केली आहे.

सध्या पावसाळयाचे दिवस आहेत, दरम्यान सध्या जो आठवडी बाजार भरतो तो किल्ला गेट ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरुन ते कुरेशी गल्ली पर्यंत भाजी पाल्याचा बाजार भरत आहे, मात्र प्राथमिक अरोग्य केंद्रापासून ते कुरेशी गल्ली पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटारी घाणीने तुडुंब भरलेल्या आहेत, त्यामुळे या भरलेल्या गटारीतील पाणी बाजूला बसलेल्या भाजी विक्रेत्यांच्या भाजीवर ही जाते, अनेक किडक ही भाज्यावर बसत असतात. परिणामी अशा दुषीत भाजी पाल्यामुळे नागरीकांचे अरोग्य ही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पालिकेने नागरीकांच्या अरोग्याचा विचार करुन तात्काळ प्राथमिक अरोग्य केंद्रापासूनचा भरणारा आठवडी बाजार हा किल्ला गेट ते क्रांती चौक, चावडी चौक ते भवानी चौका पर्यंत भरविण्यात यावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गणेश मोरडे व विजयसिंह ठाकूर यांनी केली आहे.

 
Top