नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील इंदिरा नगर मध्ये अनेक वर्षा पासून राहणाऱ्या भोगवटदार नागरीकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असून, या वंचिताना घरकुलचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपाचे नेते सुशांत भुमकर यांनी बोलताना म्हटले.

येथील इंदिरा नगरमध्ये गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून अनेक नागरीक राहत आहेत, परंतु त्यांना आदयाप ही घरकुलाचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षाच्या या काळात त्यांनी केलेल्या कामाची माहीती व नागरीकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी संकल्प ते सिध्दी या अभियांनातंर्गत प्रभागा नुसार जनता दरबार आयोजित करण्यात येत आहे. दि. 5 जुलै रोजी शहरातील प्रभाग क्रं. 2 मध्ये इंदिरा नगर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या जनता दरबारास नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून नागरीकांनी आम्हाला  प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही अशी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुशंगाने बोलताना सुशांत भुमकर म्हणाले की, सध्या येथील नागरीक हे भोगवटदार म्हणून राहत आहेत, या योजनेसाठी नागरीकांना मालकी हक्काची जागा असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी भोगवटदार हे मालकी हक्कात येण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्काचे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मिळवून देण्यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. त्याच बरोबर या वेळी नागरीकांनी नळाच्या पाण्या विषयी आणि पथदिव्यांच्या बाबतीत प्रश्न मांडले. यावेळी या जनता दरबाराचे प्रास्ताविक सौ. कल्पनाताई गायकवाड यांनी केले तर आभार धिमाजी घुगे यांनी मानले. या जनता दरबारास रियाज शेख, आनंद पवार, संदीप गायकवाड, मंन्सूर शेख, मुश्ताक शेख, अक्षय भोई, मयुर महाबोले यांच्यासह महीला पुरुष बहुसंख्यने उपस्थीत होते.


 
Top