उमरगा (प्रतिनिधी)-  8 जुलै हा दिवस देशभर राष्ट्रीय कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब उमरग्याच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करू या हा उपक्रम आज पासून सुरू केला आहे. उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे नवजात मुलींचे रोटरी क्लबच्या वतीने एक ड्रेस, साडी, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोमल जाधव मॅडम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालयातील एकूण चार नवजात बालकांना ड्रेस व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री देवी यल्लालिंग्ग दूधभाते, लक्ष्मी भालचंद्र इंगळे, सरस्वती संजय इटकर, छकुली अनिल जाधव या महिला पालकांचे साडी देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब उमरग्याचे अध्यक्ष डॉ. प्रा. धनंजय मेनकुदळे, क्लबचे सचिव प्रा. राजू जोशी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ बिराजदार स्त्री रोग तज्ञ, डॉ. डुकरे, स्वाती डोंगरे, नदीवाडे, पेटकर, घंटे इत्यादी वैद्यकीय स्टॉप उपस्थित होता. रोटरी क्लबच्या अँन्स कविता अस्वले, सविता दळवी, वंदना मेनकुदळे, शिल्पा परळकर,सागरिका वेदपाठक यांच्या हस्ते बाळांना नवीन ड्रेस, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. हा उपक्रम रोटरी क्लबच्या वतीने वर्षभर राबवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी रो. कमलाकर भोसले, रो. शिवकुमार दळवी, धनंजय वेद पाठक, प्रा. डॉ. मन्मथ माळी, श्री झळके, या सर्वांच्या सहकार्य लाभले.


 
Top