तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा  माजी मंत्री व खासदार सुनील तटकरे, रुपालीताई चाकणाकर यांनी सोमवार दि. 21 जुलै रोजी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली. त्यांनी देवीसमोर मनोभावे प्रार्थना करत कुलधर्म आणि कुलाचार विधीपूर्वक पार पाडले.

खासदार सुनिल तटकरे यांच्या समवेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर तसेच मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे हे देखील उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी देवीच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांचा पुजेचे पौराहित्य पुजारी अविनाश गंगणे यांनी केले. मंदिर संस्थानच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी, गोकुळ शिंदे,मंदिर संस्थानचे सहायक जनसंपर्क अधिकारी अतुल भालेराव, तसेच संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.


 
Top