धाराशिव (प्रतिनिधी)-  ऑनलाईन आर्थिक फसणुक झालेली एकुण रक्कम 3 लाख 30 हजार 949 रूपये फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे धाराशिव जिल्ह्यातील फिर्यादी आशा सोमनाथ शिंदे रा. तुळजापूर, शोएब नरिरुद्दीन रा. धाराशिव, नितीन भास्कर घुगे, रा. नळदुर्ग, मारुती सोमनाथ कोकरे, रा. भुम व स्वप्निल कुंडलिक कुंभार रा. तुळजापूर यांनी त्यांची अनुक्रमे 40 हजार,18 हजार, 1 लाख 8 हजार, 99 हजार व 65 हजार अशी एकुण 3 लाख 30 हजार 949 रूपये ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाले बाबत एनसीसीआर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सायबर पोलीसांनी तात्काळ संबंधित बॅक, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व पेमेंट गेटवेंशी पत्रव्यवहार करुन आरोपींच्या विविध बॅक खात्यात वर्ग झालेले सर्व बॅक खाते गोठविले होते. त्यानंतर सायबर पोलीसांनी संबंधित बॅकांच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करुन फसवणुक झालेली रक्कम 3 लाख 30 हजार 949 फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.

सदरची कारवाईपोलीस अधिक्षक रितू खोखर सो. व अप्पर पोलीस अधिक्षक शफकत आमना सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चोरमले, सपोनि कासुळे, सफौ कुलकर्णी, पोहक हालसे, मपोना पौळ, पोशि जाधवर, पोशि भोसले, पोशि मोरे, पोशि तिळगुळे, पोशि कदम, पोशि काझी, मपोशि शेख, मपोशि खांडेकर, पोशि शिंदे, पोशि पुरी, पोशि अंगुले पोशि बिराजदार व पोशि गाडे यांनी केली आहे.


 
Top