भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील चांदवड गावातील हनुमान मंदिर ते जिल्हा परिषद शाळाकडे जाताना विद्यार्थ्यांना चिखलातून व खड्ड्यातून जावे लागत आहे. ग्रामपंचायत ने रस्ता दुरुस्त करून विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी लवकरात लवकर रस्ता तयार करावा. अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश कावळे यांनी दिला आहे.


 
Top