धाराशिव (प्रतिनिधी)- मुख्याध्यापक विदयानंद गोपाळराव पाटील यांचा सेवापुर्ती कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटंग्री येथे आयोजित करण्यात आला होता.
शिक्षणविस्तार अधिकारी,बापू शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हरिभाऊ बनसोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,धाराशिव, शाळेतील शिक्षकांच्या वतीने पाटील यांना सपत्नीक भर आहेर,शाल,हार,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षकांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाटील यांच्या बदल आपूलकी, प्रेम,त्यांनी सर्वांना दिलेली वागणुक,त्यांचा नेहमी प्रसन्न चेहरा,हसत खेळत,एकमेकांना कठीण प्रसंगातून काढलेले मार्ग यांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. विदयानंद पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की, हरिभाऊचें नेहमी मार्गदर्शन व सहकार्य असल्यामुळे मला कोणतीच समस्या कठीण वाटली नाही. संपूर्ण गांव एका बाजूला आणि ते माझ्या बाजूला असल्याने मला हत्तीचे बळ मिळत गेले. बापू शिन्दे यांनी पाटील यांना पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुढे सहकुटुंब प्रवास करावा,आनंदीआयुष्य जगावे, असा सल्ला दिला. यावेळी केंद्रप्रमुख श्रीमती वाघमारे, प्रदिप तांबे,पाडूरंग तनमोर,अरुण खराडे,विक्रम लोमटे, राहूल भंडारे,घाटंग्री आश्रम शाळेचे मुख्याध्यापक माने,आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.