परंडा (प्रतिनिधी )- श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांना रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी शिर्डी येथे बी दी चेंज फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेत या सामाजिक संस्थेने त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.त्यामुळे शिक्षण महर्षी गुरुवारी रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान व श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.चाटी यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव,

डॉ.हेमंत भगवान ,डॉ.चाटी व उपप्राचार्य ,डॉ महेशकुमार माने ,कनिष्ठ भागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अतुल हुंबे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश सरवदे,डॉ. सचिन चव्हाण  तज्ञ मार्गदर्शक वृक्ष संवर्धन समिती महाराष्ट्र राज्य,यांच्यासह महाविद्यालयातील संशोधन करणारे विद्यार्थीनी उपस्थित होते.डॉ शहाजी चंदनशिवे यांना मिळालेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे गुरुवर्य डॉ.अशोक मोहेकर श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर ,अध्यक्ष सुनील शिंदे ,सुनील चंदनशिवे,सचिव मदत व पुनर्वसन मंत्री मंत्रालय मुंबई ,अंबादास चंदनशिवे जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई ,माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे ,स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रोफेसर डॉ.देविदास वायदंडे माजी केंद्रप्रमुख सुधाकर ओव्हाळ.प्रा गिरीष टिभे ,पुणे येथील सामाजीक कार्यकर्ते चंद्रकांत लोंढे, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील प्राचार्य डॉ महादेव गव्हाणे श्री शिवाजी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर ,जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सचिव  प्राचार्य आशाताई मोरजकर यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे  अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत असणाऱ्या सर्व मित्र परिवार यांनी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांचे कौतुक करत अभिनंदन केले .

 
Top