तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील कामठा गावात अल्पशा पावसामुळे ग्रामपंचायत समोर पाण्याचे तळे साचल्यामुळे आणी चिखल झाल्यामुळे ग्रामस्थांना ये -जा करताना खूप त्रास होत आहे.
तुळजापूर तालुक्यातील कामठा गावची लोकसंख्या दीड हजार आहे. सध्या या गावातील ग्रामपंचायत समोर पावसाचे पाणी साचल्याने ग्रामस्थांना याचा ञास होत आहे. ग्रामपंचायत समोरील रस्ता व्यवस्थित नसेल तर गावातील रस्ताची काय अवस्था असेल असा प्रश्न निर्माण होतो आहे. पावसाचे किंवा साचलेले पाणी वाहून नेण्यासाठी योग्य नाली गटार बांधल्या का, साचणा-या पाणी निचरा करण्याची व्यवस्थेसाठी योग्य ठिकाणी वळवण्यासाठी नाल्या केल्या का, तसेच शासनाकडुन ग्रामपंचायतीला आलेला निधी योग्य ठिकाणी योग्य कामासाठी मंजुर झाला का कि कागदोपञी केला याची चौकशी नुतन गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे यांनी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.