नळदुर्ग (प्रतिनिधी)- येथील शिवशाही तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी श्याम अज्ञान शिंदे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.
नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथे विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत माजी अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सन 2025 .. 26 सालासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली, यामध्ये सर्वानुमते श्याम अज्ञान शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुढील कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे, उपाध्यक्ष शिवाजी बाबुराव सूरवसे, नवनाथ शिवाजी पवार, सचिव नितीन रघुनाथ शिंदे, सहसचिव नितीन जाधव, कोषाध्यक्ष संतोष मुळे, सह कोषाध्यक्ष युवराज जगताप, सांस्कृतिक प्रमुख: प्रमोद जाधव, कुलवंत मुळे,श्रीकांत सावंत, मिरवणूक प्रमुख सुरेशसिंग हजारे, तानाजी मुळे, पांडुरंग गायकवाड,व्यवस्थापक ज्ञानेश्वर जाधव, महादेव जगताप, अमित येडगे आदींची निवड करण्यात आली असून येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती यासाठी करण्यात आली आहे.