तुळजापूर -(प्रतिनिधी)-येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .हे युद्ध भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये झाले होते. जवळपास सात दिवस चाललेल्या या युद्धात  527 सैनिक शहीद झाले होते. विद्यालयाचे  कमांडंट कर्नल मकरंद देशमुख  ,प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके , पर्यवेक्षक डॉ. पेटकर यांच्या हस्ते शहीद जवानांना पुष्प चक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली . तसेच  सैन्यामध्ये सेवा करून आलेले श्री सोनकांबळे ,श्री खान श्री दलाल , श्री भोसले यांच्याही हस्ते शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यालयाचे कमा. कर्नल मकरंद देशमुख बोलताना म्हणाले   आपल्या सैनिकांचे शूरता, वीरता, त्याग, बलिदान ,देशप्रेम भारतीय सैनिकांनी अत्यंत कठीण अशा प्रसंगातून ,वातावरणातून आपल्याला विजय मिळवून दिला .शिस्त ,देशप्रेम  त्याग ही भावना असली पाहिजे  तसेच निखिल मगर व सुशांत काळदाते या विद्यार्थ्यांनीही भाषणे केली. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री  सुत्रावे  सर यांनी प्रास्ताविक सुञसंचलन आभार मानले 

 
Top