धाराशिव (प्रतिनिधी)-  व्ही. पी. शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील श्री साई जनविकास आयटीआय मध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय निदेशक सुनील पुदाले यांनी करून दिला. कारगिल विजय दिवस हा आपल्या शूरवीर जवानांच्या विजयानुभावाचा अविस्मरणीय दिवस आहे. 1999 साली ऑपरेशन विजयअंतर्गत आपल्या जवानांनी शत्रूंना पराभूत करून अतुलनीय धैर्य आणि शौर्याची झळाळी उदाहरण निर्माण केली. हे युद्ध सुमारे 84 दिवस चालले. भारताला इतिहासात अनेक वेळा परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला. पण भारतीय कधीही आपल्या स्वराज्याच्या आणि स्वराष्ट्राच्या संकल्पना विसरले नाहीत. अनेक पिढ्यातील राजे, राण्या, योद्धे आणि क्रांतिकारकांनी आपल्या मातृभूमीसाठी लढा दिला म्हणून 26 जुलै हा केवळ एक दिवस नाही तो भारताच्या शौर्य,बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे असे मार्गदर्शन प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांनी केले.

यावेळी प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ.सुरज ननवरे, प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, संकुलाचे लेखापाल योगेश मंडलिक, डी. एम. घावटे, निदेशक सुनील पुदाले, निदेशक सागर सुतार, निदेशक सुमंत भोरे, निदेशक अभिजीत वीर, व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार डी. एम. घावटे यांनी मानले.

 
Top