भूम (प्रतिनिधी)- डीपीडीसी योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीचे वितरण करावे, अशी मागणी 5 जून रोजी सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. पुन्हा सरपंच परिषदेने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र दिले आहे. धाराशिव जिल्हयातील डीपीडीसी योजने अंतर्गत मिळणारा निधी अद्यापपर्यंत वितरीत करण्यात आलेला नाही. यापुर्वी आपणास सरपंच परिषदेच्या मार्फत रखडलेला निधी लवकरात लवकर वितरीत व्हावा, म्हणून निवेदन दिले होते. परंतु त्यावरती कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. आपण 20 दिवसाच्या आत निधी वितरीत न केल्यास सरपंच परिषदेला आपणास उपोषणाची नोटीस द्यावी लागेल. आपण याची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. स्मरणपत्र देताना सरपंच परिषदेचे राज्य संघटक कोहिनूर सय्यद, प्रा. सविध माननेर, राज्य प्रसिद्धी प्रमुख  गोमटे, अच्यूत पुरी आदी उपस्थित होते.

 
Top