धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव शहरातील धार्मिक शिक्षण देणाऱ्या एका संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 13 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले असुन त्याच संस्थेतील एका 21 वर्षीय तरुणाने हा अत्याचार केला आहे. पीडित बालकाच्या पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार पोस्को कायद्याअंतर्गत धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उमरगा शहरात दुकान चालवून चरितार्थ भागविणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय मुलाला धार्मिक शिक्षणासाठी धाराशिवमधील एका संस्थेत प्रवेश दिला होता. मुलगा तेथेच मुक्कामी राहून शिक्षण घेत असताना 27 जूनला सकाळी सहाच्या सुमारास संस्थेतीलच 21 वर्षीय आरोपीने खोलीत, बोलावून अनैतिक कृत्य केले व धमकी दिली. त्यानंतर त्रास होत असल्याने उपचार करून आणले. आरोपी पुन्हा तशाच कृत्यासाठी धमकावत असल्याने तो मुलगा घरी गावी पळून गेला. त्याला कारण विचारले असता त्याने हा प्रकार पालकांना सांगितला, हा प्रकार दाबण्यासाठी दबाव आणला गेला. पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी तरुणावर व हा प्रकार जाणीवपूर्वक झाकून ठेवणाऱ्या संस्थेतील जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत.

 
Top