भुम (प्रतिनिधी)- धाराशिव- जिल्ह्यातील भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी व भैरवनाथ शुगर संचलित शिवशक्ती सहकारी साखर कारखाना वाशी व भैरवनाथ शुगर वर्क सोनारी या तीन साखर कारखान्याकडे उस उत्पादक शेतकऱ्याची एफ आर पीची आठ कोटी 16 लाख रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांची घामाची रक्कम तातडीने सात दिवसाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावी. अन्यथा सात दिवसात तिव्र अंदोलत करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन राज्याचे साखर आयुक्त यांना पुणे येथे जावून दिले आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जैन, शहर प्रमुख रईस भाई मुजावर, संचालक शंकर जाधव, भालचंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top