तुळजापूर (प्रतिनिधी)- बेंबळी रस्ता ते नावंदर प्लॉटिंग रस्ता काँक्रिटीकरण व नाली काम अंदाजपत्रका नुसार झाले नसल्याने याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकारी यांना निवेदन देवुन केली.
तुळजापूर खुर्द येथील शिंदे प्लॉटिंग मधील बेंबळी रस्ता ते नावंदर प्लॉटिंग हा बारा मीटर रस्ता सिमेंट काँक्रीट व दोन्ही बाजूने नालीचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नाही. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनावश्यक बिम टाकल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अंदाजपत्रकामध्ये नसलेल्या बीम मुळे बारा मीटरचा रस्ता अरूंद होवून दहा मीटरचा रस्ता राहिला आहे. या शिवाय या बीम मुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी अंदाजपत्रकात नसलेल्या बीम ची चौकशी करून दोषी गुत्तेदार व अभियंत्यावर कारवाई करावी व गुत्तेदार तसेच अभियंत्या कडून खर्चाची वसुली करावी. कारवाईस विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इषारा डाँ अण्णाभाऊ साठे क्रांती सेना यांनी निवेदन देवुन दिला.