तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थान कडून मागील महिन्यात काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या. या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान कडून प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. 

नोटीस बजावण्यात आलेल्या पुजाऱ्यांपैकी 6 जणांनी नोटिशीची दखल घेऊन आपला माफीनामा सादर केला होता. त्यांच्यावर 1 महिन्याची प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये पुजारी लखन रोहिदास भोसले, अक्षय किशोर कदम-भैय्ये, विशाल हनुमंत चव्हाण, धीरज राजू चोपदार, वैभव खुशालराव भोसले, राहुल हनुमंत पवार हे आहेत.

याशिवाय 2 जणांनी नोटिशीला कोणतेही उत्तर न दिल्याने त्यांच्यावर 3 महिने प्रवेशबंदी ची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पुजारी विशाल दादासाहेब मगर, विशाल बाळासाहेब गंगणे हे आहेत. संबंधित पुजाऱ्यांना अशोभनीय व मंदिराचे शिस्तीस बाधा आणणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण करणारे वर्तन करण्यास जबाबदार ठरवण्यात आले आहे. ही कारवाई देऊळ कवायत कायदा 1909 कलम 24 व 25 नुसार करण्यात आलेली आहे.


 
Top