तुळजापूर (प्रतिनिधी)- पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवार दि 3 रोजी नववी वर्गातील नवागत विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय, अलवर (राजस्थान) येथील शैया क्षणिक सत्र 2025-26 या वर्षासाठी आलेले आहेत. त्यांचे गुलाब पुष्प देऊन विद्यालयाचे प्राचार्य के. वाय. इंगळे व उप प्राचार्य डी. व्ही. बढे यांच्या हस्ते जोरदार स्वागत करण्यात आले.  

हे विद्यार्थी वर्षभर येथे  राहून महाराष्ट्रातील संस्कृती ,खानपान पोशाख ,अन्नधान्य,  सण, उत्सव, नवरात्र उत्सव, मराठी भाषा यांचा अभ्यास करून या सर्व गोष्टींचा  राजस्थानमध्ये प्रचार प्रसार करणार आहेत. याचा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीय एकात्मता साधने हा आहे. या अभ्यासासाठी 14 विद्यार्थी व 8 विद्यार्थिनी आलेले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन महाराष्ट्र संस्कृतीचा अभ्यास करून महाराष्ट्रीयन संस्कृती राजस्थानमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू अशा प्रकारचे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. जी. जाधव यांनी केले.

 
Top