धाराशिव (प्रतिनिधी)- सायबर पोलीस ठाणे :आरोपी नामे-उत्तरेश्वर दामोदर इटकर, वय 45 वर्षे, रा.सोनेसांगवी ता. केल जि. बीड, अस्लम दस्तगीर तांबोळी, वय 32 रा. शेळका धानोरा ता. कळंब जि. धाराशिव सुरज घाडगे, रा. सातेफळ ता. केज जि. बिड, नामदेव कांबळे, रा. अंबेजोगाई जि बिड, एम.डी. पाटील, रा. नांदेड यांनी दि.01.01.2025 रोजी 00.00 ते दि.15.07.2025 रोजी 18.00 वा. सु. संगणमताने शासनाची बंदी असलेले बीडीजी ऑनलाईन गेम, दमन ऑनलाईन गेम व टी.सी. ऑनलाईन गेम या सारख्या ऑनलाईन गेमच्या लिंक व्हॉटसॲपद्वारे लोकांना पाठवून कमी पैशात आमिष दाखवून ऑनलाईन गेमचा जुगार खेळवून स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी अनेक लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे. व करत आहेत. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश बापुराव कासुळे, सहा. पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सायबर यांनी दि.15.07.2025रोजी दिलेल्या प्रथक खबरेवरुन पो ठाणे सायबर येथे भा.न्या.सं.कलम 318(4),3(5) सह कलम 66(सी), 66(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सह कलम 12(अ) मुजुका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.