भूम (प्रतिनिधी)- भूम येथील आठवडे बाजारामध्ये अखेर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोरी घडू नये, चोरट्यांवर पोलीस प्रशासनाचा कंट्रोल राहावा यासाठी दि. 24 जुलै रोजी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मागील आठवड्यामध्ये दुचाकी मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली होती व इतर छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या होत्या .या आठवडे बाजारामध्ये होणाऱ्या चोऱ्या होऊ नयेत यासाठी दैनिक सकाळमध्ये सातत्याने आठवडे बाजारामध्ये पूर्वीप्रमाणे पोलीस कर्मचारी साईनाथ करण्यात यावेत .अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते .त्यानंतर पोलीस प्रशासनाने आठवडे बाजारामध्ये तीन पोलीस कर्मचारी तैनात केल्याने चोरट्यांवर अंकुश राहुन आज आठवडे बाजारामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी झाली नसल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितले .पुढील काळातील अशाच प्रकारे पोलीस प्रशासनाने कर्मचारी तैनात करून व्यापारी व शेतकऱ्यांना होणाऱ्या चोऱ्यापासून मुक्तता व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.