कळंब (प्रतिनिधी)- अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील या शेतकरी नेते यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेध दर्शवत आज दि. 24 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे छावा संघटना कळंब तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले .
आंदोलन छावा संघटना तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रदीक गायकवाड, रोहन पाटोळे ,आर्यन लोहार, आदित्य यादव, अक्षय शिंदे ,अजित व्होके ,अजित घाटोळे, ज्ञानेश्वर पाटोळे ,शुभम सावंत, दीपक वाघमोडे ,आशिष चौधरी, अमर गायकवाड ,दीपक बोराडे ,वसुदेव पाचंगे, राहुल पाटील, बाळासाहेब गव्हाणे, मनोज गायकवाड, राजकुमार सावंत,प्रशांत शिंदे ,प्रथमेश काशीद ,शरणात कोरे सह आदी उपस्थित होते.
छावा संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी उपस्थित राहुन आंदोलनात सहभाग घेतला. मराठा आंदोलक प्रतीक गायकवाड यांनी आंदोलनाला हजर राहून जाहीर पाठिंबा दिला.