भूम (प्रतिनिधी)- जामखेड भूम पार्डी राज्यमार्ग क्र 57 ओव्हरहेड बोर्डवर अनधिकृतपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  दिशादर्शक हलकावर व्यावसायिकांच्या व्यवसायाच्याजाहिराती लावल्या असून दोन वेळेस नोटीस बजावून सुद्धा व्यावसायिकाने जाहिराती न काढल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे अक्षम दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे .

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रवाशांना पुढील जिल्ह्यामध्ये कोण कोणती शहरे तालुके गाव याची माहिती या दिशादर्शक फलकावर टाकलेली असते. परंतु खर्डा गावातील काही व्यावसायिक मागील काही वर्षापासून या दिशादर्शक फलकाचा उपयोग स्वतःच्या व्यवसायाच्या जाहिरातीसाठी केला जात आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील काही काळात या व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात येते. मात्र हे व्यावसायिक या नोटिसीला कोणत्याही प्रकारे उत्तर न देता, त्यांच्या व्यवसायाच्या जाहिराती कायम या फलकावर लावतात. सार्वजनिक  बांधकाम विभागाने कडक भूमिका घेऊन दिशादर्शक फलकावरील व्यावसायिकांनी लावलेल्या जाहिराती काढून टाकाव्यात. अशी मागणी प्रवासी वर्ग मधून व नागरिकांमधून होत आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासकीय ओव्हरहेड बोर्डवरील अनाधिकृतपणे जाहिरात फलक लावलेले आहे. यासंबंधी व्यावसायिकाला तीन ऑक्टोंबर व सतरा जून रोजी नोटीस देऊनही अद्याप अनधिकृतपणे लावलेली जाहिरात काढलेली नाही.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासकीय ओव्हर हेड बोर्डावरील अनधिकृतपणे लावलेली जाहिरात न काढल्यास सदरील व्यावसायिकावर कारवाई करण्यात येईल.

आर. आर. गिराम

अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भूम.


 
Top