कळंब (प्रतिनिधी)- मराठवाडा विभागातून प्रथम पुरस्कार दि.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबई तर्फे देण्यात येणारा पद्मश्री कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार कळंब येथील प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. ला राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर आणि कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते दि. 23 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
याप्रसंगी पुरस्कार स्वीकारताना बँकेचे चेअरमन प्रा. श्रीधर भवर, संचालक नानासाहेब इखे, विजयानंद तांबारे,विक्रम गायकवाड, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदिप शिंदे, आशिष हेड्डा, वसुली अधिकारी संतोष गायकवाड,भिमा हगारे उपस्थित होते.