तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात एकुण 23 जागांपैकी पाच जागा रिक्त असल्याने तालुकावासियांना वेळेवर कागदपत्रे मिळेत नसल्याने अनेकांचे महत्वाचे कामे खोळंबत आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे. यामुळे तालुक्यातील जनतेचे कामे खोळंबत असल्याने या पाच रिक्त जागा तात्काळ भरण्याची मागणी होत आहे.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि तिर्थक्षेञ तुळजापूर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर हे मागील पंधराते वीस वर्षापासुन राज्यात बहुचर्चित बनले आहे. सध्यातिर्थक्षेञ तुळजापूर येथे श्रीक्षेञ तुळजापुर विकास आराखडासाठी अठराशे कोटी निधी मंजुर झाला आहे. तसेच तिर्थक्षेञ तुळजापूर रेल्वे मार्गा काम प्रगती पथावर आहे. चेन्नई सुरत महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, नळदुर्ग अक्कलकोट महामार्ग यासह अनेक तुळजापूर तालुका विकासाचे कामे मोठ्या प्रमाणात आहे. या कामांसाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथील कागदपत्रे महत्त्वाची आहेत. सध्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर कार्यालयात 23पैकी पाच जागा रिक्त असुन त्यात छाननी लिपीक, कनिष्ठ लिपीक, अभिलेखापाल लिपीक, लघु लिपीक, दप्तरबंद लिपीक या महत्त्वाचा कागदपत्रे तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जागा रिक्त आहेत. ते मिळेत नाही .कामासाठी आलेले लोक चकरा मारुन वैतागून जात आहे जे उपस्थिती कर्मचारी आहेत त्यांना कामांसाठी आलेल्या लोकांचा प्रश्नांना उत्तरे देताना नाकेनऊ येत आहेत. कार्यालय जागा ही सध्या कमी पडत आहे. सध्या तालुक्यातुन कामासाठी रोज पन्नास ते साठ लोक येत आहेत.