तुळजापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ने कामगार विरोधी व कॉर्पोरेट धार्जिण्या 4 श्रम संहिता अंमलबजावणी रद्द करण्याचा मागणी  साठी 9 जुलै2025 देशव्यापी संप पुकारला असल्याची माहीती इंटक जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके यांनी दिली.

केंद्र सरकारने एप्रिल 2025  पासून कामगार विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे 4 श्रम संहिताची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय श्रम मंत्र्यांनी राज्याच्या श्रम खात्याचे सचिव व अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या श्रमसंहिता राबविण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. कामगाराचे कामाचे तास, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, संघटित होण्याचा अधिकार, युनियनला मान्यता मिळून घेण्याचा अधिकार, असमूहिक वाटाघाटीच्या माध्यमातून मागण्या करून घेण्यासाठी संप व लढाई करण्याचा मूलभूत अधिकारावर या श्रमसंहितामुळे गदा येणार आहे. श्रमसंहिता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कार्पोरेट मालकाचे भले करण्यासाठी कामगारावर लादण्यात येणारी गुलामी आहे. 

तरी धाराशिव जिल्ह्यातील सर्व श्रमिक संघटनांना व संघटित कामगार व असंघटित कामगार यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन इंटक  जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके, जिल्हा सचिव किरण यादव, इंटक जिल्हा उपाध्यक्ष विकास हावळे, इंटक युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगळे, तालिका सचिव सुहास कानडे  यांनी केले आहे.


 
Top