तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर : शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे उपनेते ज्ञानराज चौगुले,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते,धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तुळजापूर तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वात तुळजापूर तालुक्यातील मौजे बारूळ येथे शिवसेना पक्षाच्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे व तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या शुभहस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण बारूळ गाव भगवामय झालं होतं. ढोल-ताशांच्या गजरात, हलगी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर शिवसेना प्रेमात न्हालेला पाहायला मिळाला. या कार्यक्रमास बारूळ गावातील समस्त ग्रामस्थ, नूतन पदाधिकारी, तसेच तालुका व शहरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्साही वातावरण हे शिवसेनेच्या वाढत्या लोकप्रियतेचे प्रतिक ठरले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी मोठ्या प्रमाणात पक्षबांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश करून सभासदत्व प्रदान केले असून, संपूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात शाखा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याच संकल्पाचा पहिला टप्पा म्हणून बारूळ येथील शाखा सुरू करण्यात आली आहे.

बारूळ येथील या जल्लोषपूर्ण उद्घाटनामुळे तालुक्यातील अन्य राजकीय पक्षांमध्ये खळबळ माजली असून, शिवसेनेच्या संघटनशक्तीच्या वाढत्या प्रभावामुळे एक प्रकारचे दबावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या शाखेच्या माध्यमातून गावातील युवक, महिलावर्ग व सर्वसामान्य जनतेपर्यंत पक्षाचे धोरण पोहोचवून स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प शिवसेनेने व्यक्त केला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते,तुळजापूर शहर अध्यक्ष बापूसाहेब भोसले,शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,नितीन मस्के,बारूळ शाखेचे अध्यक्ष समाधान क्षीरसागर,उपाध्यक्ष नागेश चौधरी,सचिव विपिन मगर,कोषाध्यक्ष सुजीत सगर,सदस्य नवनाथ क्षीरसागर,वैजनाथ भालेराव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top