भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील ईट येथे शेतकऱ्यांची कर्जमाफी व विविध मागण्यासाठी नागेवाडी चौक येथे रास्ता रोको आंदोलन शेतकरी पुत्र व प्रहार संघटना यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनामध्ये परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. भूम - पाटोदा या रस्त्यावरील ईट येथील मुख्य चौकामध्ये सकाळी 10 ते 11:00 दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून पत्ते खेळून शासनाचे विशेष लक्ष वेधून घेतले. निवडणुकी अगोदर सत्ताधारी पक्षांनी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण करावे सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ करण्यात यावी,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना  आर्थिक मदत देण्यात यावी , शेत मालाला हमीभावाची हमी प्रत्यक्षात दिली जावी ,पिक विम्याचा लाभ वेळेवर व योग्य प्रमाणात देण्यात यावा.

  या मागण्यासाठी परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरले झाले..रस्त्याच्या दोन्ही बाजून लांब रांगा लागल्या होत्या. आपल्या शेतकरी वडिलांची कर्जमाफी व्हावी म्हणून लहान मुली पण या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिस प्रशासनाचे चोख बंदोबस्त लावला होता. स्कूल बस व दवाखान्यात जाणाऱ्या पेशंटच्या वाहनांना आंदोलन कर्त्यांनी त्वरित रस्ता मोकळा करून दिला. शेवटी मंडळ अधिकारी अमर आटूळे यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. आयोजन गणेश भोसले, विलास पवार, चेतन बोराडे, वर्षद शिंदे, सुधीर रसाळ, गोरख भोरे यांनी केले.

 
Top