तुळजापूर (प्रतिनिधी)- दर्श अमावस्येच्या निमित्ताने श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिरात मंगलमय वातावरणात नंदादीप पूजन करण्यात आले. सायंकाळच्या वेळी नंदादीप पूजन महंत वाकोजी बुवा यांच्या हस्ते पार पडले.
पूजनाच्या वेळी मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भरून गेला होता. विशेषतः नंदादीप पूजनाचा क्षण भक्तांसाठी अत्यंत भावनिक व पावन ठरला. यावेळी उपस्थित भाविकांनी भवानी देवींच्या जयघोषात नंदादीप पूजनात सहभाग नोंदवला.