तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंदिर परिसरातील विविध विकासकामांचा प्रगती अहवाल सादर करण्यात आला. तसेच भविष्यातील कामांची दिशा ठरवण्यात आली.

या बैठकीस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी, सवानी कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी तसेच पुजारी मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मंदिर परिसरातील महत्त्वपूर्ण कामांवर चर्चा झाली. विशेषतः भवानी मंडपाच्या नूतनीकरणासाठी तयार करण्यात येत असलेल्या खांबांच्या गुणवत्तेची आणि बांधकामाच्या अचूकतेची जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा दर्जा आणि डिझाईन हे पुरातत्वदृष्ट्या व धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन केले जात असल्याची खात्री त्यांनी केली.


 
Top