तुळजापूर (प्रतिनिधी)-  मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे. त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निषेध करून माथेफिरू आरोपी असलेला दीपक काटे याला शिक्षा देण्यात यावी. असे आशयाचे तहसीलदार तुळजापूर यांना निवेदन दिले.

दरम्यान महाराष्ट्र शासनाने पारित केलेले जनसुरक्षा विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे, अशी मागणी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. दिलेल्या मागण्या मान्य न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उग्र आंदोलन करेल असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष तानाजी कदम, प्रकाश कदम, अरुण कदम, विक्रांत हावळे, तालुका उपाध्यक्ष विष्णू सोनवणे, अमोल कदम, अशोक कांबळे, धम्मशील कदम, आप्पा कदम, रवि वाघमारे, तानाजी डावरे, महादेव सोनवणे, दाजी माने, तालुका उपाध्यक्ष राज कदम,  सुशील कदम, श्रीमंत चंदनशिवे, ज्ञानदेव कदम, चोकोबा शिरसाट, चंचल कदम, चेतन सोनवणे, अविनाश भगत, झुंबर चंदनशिवे, दत्ता हावळे, विकास कदम, अशोक देशमुख, हिरा सोनवणे, शरणाथ कदम यांच्यासह आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top