भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत दिनांक 18 जुलै 2025 रोजी शंकरराव पाटील महाविद्यालयात विद्यार्थी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विद्यार्थी संवादासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. यशवंत शितोळे सर अध्यक्ष,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र हे उपस्थित होते. त्याचबरोबर मंचावरती विद्या विकास मंडळ पाथरूड संस्थेचे उपसचिव व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर हे उपस्थित होते त्याचबरोबर महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बोराडे सर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. गव्हाणे सर, डॉ. पडवळ सर हे उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना माननीय शितोळे सरांनी विद्यार्थ्यांना नवीन ए.आय. तंत्रज्ञानाबद्दल अधिक मोलाची माहिती दिली. मोबाईलचा वापर करत असताना प्रायव्हसी किती प्रमाणात आहे याबद्दलही सरांनी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले. वेळेचे नियोजन करून अभ्यासाला किती वेळ, घरच्यांशी संवादासाठी किती वेळ आणि मोबाईलचा वापर किती वेळ करायचा याचा समन्वय साधण्याच मार्गदर्शन देखील सरांनी या वेळेस केलं. 'करिअर कट्टा' अंतर्गत आयएएस आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला यादरम्यान विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन त्यासोबतच नवीन उद्योग निर्मिती बद्दल मार्गदर्शन केल्या जातं, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असंही सांगितले.

या उपक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर करिअर कट्टयातील करियर संसदेतील नवनियुक्त पदाधिकारी देखील या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते. यावेळेस विद्यार्थी करिअर संसदेतील मुख्यमंत्री साक्षी वाघमारे या विद्यार्थ्यांनीचे देखील स्वागत केले. 

या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामीण समन्वयक डॉ. खराटे सर, तालुका समन्वयक कराळे, डॉ. पडवळ, डॉ. अलगुंडे मॅडम, प्रा. राठोड सर हे उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हा निवड समितीतील सर्व पदाधिकारी देखील या उपक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अलगुंडे एस.एम. यांनी केले तर आभार प्रदर्शन हे तालुका समन्वय प्राध्यापक कराळे जी. डी. यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

 
Top