धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा मंजूर केला आहे. या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरोधात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्कांची पायमल्ली होणार आहे. त्यामुळे या जनविरोधी कायद्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने विधेयकाची होळी करीत जाहीर निषेध करण्यात आला. त्या विधेयकावर राज्यपालांनी सही करू नये. तसेच ते विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल दि.18 जुलै रोजी पाठविले आहे.
विशेष म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार, लेखक यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे. त्यामुळे राज्यपालांनी या कायद्याविरोधात जनक शोध लक्षात घेऊन या जनसुरक्षा कायद्याच्या मसुद्याला अधिसूचनेने अंतिम मान्यता देऊ नये व सही करू नये. अशी आर्त मागणी केली आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड धीरज पाटील, शेरखाने, खलील सय्यद, महबूब पाशा पटेल, विलास शाळू, उमेशराजे निंबाळकर, विनोद वीर, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, अमोल कुतवळ, आयुब खान पठाण, डॉ स्मिता शहापूरकर, श्यामसुंदर तोरकडे, अशोक बनसोडे, समाधान घाटशिळे, कपिल सय्यद, आनंद घोगरे, कानिफनाथ देवकुळे, धवलसिंह लावंड, तनुजा हेड्डा, जाकीर पठाण, फरीद खोंदे, सचिन सिरसाठे, सुधीर गव्हाणे, बाबासाहेब गडकर, गोरोबा झेंडे, सर्फराज काझी, अभिमान पेठे, अकबर शेख, लिंबराज जैन, बालाजी उबाळे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.