धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब यांचा मराठवाडा दौरा सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 21 जुलै रोजी  धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका यांच्या अध्यक्षतेखाली तसेच  प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,प्रदेश सरचिटणीस सुरेश  पाटील यांच्या उपस्थितीत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये पार पडली.

या आढावा बैठकीमध्ये सुनील तटकरे साहेब यांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली. राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या वतीने दौऱ्याची जिम्मेदारी घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे  यांनी आपले मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करताना त्यांनी खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती उपस्थित पदाधिकारी यांना दिली. उपस्थित पदाधिकारी यांनी आपले वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आदेश यांचे पालन करू असे एकमताने या बैठकीमध्ये सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांचा धाराशिव दौरा हा त्यांचा अविस्मरणीय ठरेल असे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने विश्वासाने सांगण्यात आले. 

या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या सोबत प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार,प्रदेश सरचिटणीस सुरेश बापू पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे,शहर अध्यक्ष सचिन तावडे, तुळजापूर शहर अध्यक्ष महेश चोपदार,कळंब तालुका अध्यक्ष शिवाजीराव लकडे, भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे, वाशी तालुकाध्यक्ष ॲड.सूर्यकांत सांडसे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंखे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल अकबर खान पठाण,सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष ॲड.इंद्रजीत शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे,युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस ॲड.सचिन सरवदे,युवक प्रदेश  सरचिटणीस शंतनू खंदारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल, बालाजी वगरे,तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष बसवण्णा मसुते, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष कमलाकर घुटे, बंजारा सेल जिल्हाध्यक्ष सुरेश राठोड, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी,कळंब युवक तालुकाध्यक्ष अमर मडके,धाराशिव तालुका उपाध्यक्ष नितीन चव्हाण,अल्पसंख्यांक धाराशिव तालुकाध्यक्ष नासिर शेख, अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष सराफ शेख,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार गळाकाटे,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद कोतवाल,आदिवासी सेल जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुमार शिंदे,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अराफत काझी, जिल्हा सहसचिव आदम जमादार, शन्नू रुबा पठाण, अशोक खंडागळे,सुभाष कदम सलीम पठाण, शेख सलमान तसेच या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top