धाराशिव (प्रतिनिधी)- प्रस्तावित जनसुरक्षा कायदा व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे बाबतीत फोरम ऑफ सिटीझन्स फुक सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले,यात म्हण्टले की,शहरी नक्षलवाद रोखण्याचा बहाना करून,आपले सरकार जो “ जनसुरक्षा कायदा “ आणू पाहत आहे, तो त्वरित रद्द करावा. कारण या कायद्यामुळे नागरिकांच्या व्यक्त होण्याच्या अधिकारावर आणि सरकारच्या धोरणाविरोधात कायदेशीर मार्गाने सनदशीर आंदोलन करण्यासाठी , भारतीय राज्य घटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारावर बंधने येणार आहेत. थोडक्यात, सरकारने चुकीचे व जनविरोधी निर्णय घेतले तरी, नागरिकांनी सरकारच्या विरोधात कायदेशीर मार्गाचा लढा उभाच करू नये, या उद्देशानेच हा जनसुरक्षा कायदा आणला जात आहे, अशी ठाम धारणा सुजाण महागाराष्ट्रीयन नागरिकांची आज झालेली आहे. म्हणजेच हा कायदा हा जनतेच्या कायदेशीर अधिकारावर गदा आणणारा आहे. हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर सरकारविरोधातील जनतेचे आंदोलन दडपून, सरकारची सुरक्षा करण्यासाठी आणला जात असल्याचे, जवळपास आता स्पष्टच झाले आहे. महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना तसेच पुरोगामी विचारधारेच्या चळवळी, दडपून टाकण्यासाठी सदर कायदा आणला जात आहे, याची खात्रीच आता तमाम महाराष्ट्रवाश्यािंना झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील नागरिक व फूक संघटनेच्या वतीने आम्ही सदर प्रस्तावीत जानसुरक्षा कायद्याचा निषेध व विरोध करत आहोत.आपले सरकारन उभारू पहात असलेला “ शक्तीपीठ महामार्ग “ त्वरित रद्द करण्यात यावा. कारण सदर मार्गमुळे महाराष्ट्राच्या नागरिकांचा फायदा तर नाहीच, उलट नुकसानच होणार आहे. आज उभारण्यात आलेले महामार्ग, रेल्वे मार्ग, पवनचक्क्या, धरणे ई साठी अगोदरच शेताकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर पूर्वीच आधीग्रहित करण्यात आलेल्या आहेत. प्रस्तावीत शक्तिपीठ मार्गात संपूर्ण सुपीक जमीन जाणार आहे. अगोदरच अल्पभूधारक झालेला गरीब शेतकरी, या मार्गमुळे भूमिहीन होण्याच्या मार्गवर आहे. तसेच मुळात या मार्गाची महाराष्ट्राला आवशकताच नाही. कारण नागपूर ते रत्नागिरी हा 900 किमी लांबीचा सिमेंटचा महामार्ग अगोदरच अस्तित्वात आहे. प्रस्तावीत असलेला शक्तिपीठ मार्ग, याच पूर्वीच्या मार्गला जवळपास समांतर जाणार आहे. त्यातून काय साध्य होणार आहे ? त्याउलट नांदेड - बीड - नगर असा किंवा बीड - बुलढाना - अकोला - अमरावती असा मार्ग बांधा, ज्याची आज गरज आहे. बरे देवीची चारही शक्तिपीठे आज राष्ट्रीय किंवा राज्य मार्गनी अगोदरच जोडलेली आहेत. मग शक्तिपीठ मार्गाचा हट्ट करून, जनतेच्या पैशाचा वायफट चुराडा आपण कशासाठी करत आहात ? त्यापेक्षा तोच पैसा अन्नधान्या प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी वापरा. शेतकऱ्यांच्या मालाची मागणी वाढेल. शेतमालाला चांगला भाव मिळेल. कोण्यातरी मोठ्या राजकीय गुत्तेदाराच्या फायद्यासाठी, सदर मार्ग आपले सरकार रेटत आहे काय ? अशी शंका आज सर्वसामान्य जनतेला येत आहे. आपलेच पाटीराखे असलेले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सदर मार्गला कायमची स्थगिती दिली होती, हे येथे विशेष. एका माजी मुख्यमंत्र्याने जनतेला दिलेल्या शब्दाला, आज फडणीसजी आपण काळे फासत आहात, हे तुम्हाला व तुमच्या पदाला अशोभनीय आहे. प्रस्तावीत शक्तीपीठ मार्गाचा धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या व फूक संघटनेच्या वतीने, आम्ही निषेध तसेच विरोध करत आहोत. अशा प्रकारचे लेखी निवेदन आरडिसी शोभा जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा करुन देण्यात आले, यावेळी अध्यक्ष धर्मविर कदम, सचिव गणेश वाघमारे. उपाध्यक्ष उमाकांत माने.सदस्य शेख रौफ, राजेंद्र धावारे,आर के पंखे,बि डी चव्हाण,बि व्ही हाजगुडे, सिध्देश्वर बेलुरे सह इतर उपस्थित होते.